बनावट वेबसाईटच्या माध्यमातून व्यावसायीकाची लाखो रुपयात फसवणूक

जळगाव : बनावट वेबसाईट, बनावट ई –वे बिल आणि बनावट टॅक्स इनव्हाईसच्या माध्यमातून विश्वास संपादन करत रावेर येथील बांधकाम मटेरियल विक्रेता व्यावसायीकाची लाखो रुपयात फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. या फसवणूक प्रकरणी सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेर येथील व्यावसायीक मोहनलाल देवजी पटेल यांचा मुलगा भावेश याच्या मोबाईल क्रमांकावर करण रांका असे नाव सांगणा-या इसमाने आपली इंडीया मेटल ट्रेडर्स नावाची कंपनी असल्याचा मेसेज पाठवला. बांधकामाला लागणारे स्टील मटेरियल आपणास पाठवतो असे सांगून बनावट वेबसाईटच्या माध्यमातून विश्वास संपादन केला.

व्हाटसअ‍ॅपद्वारे बनावट टॅक्स इनव्हाईस व बनावट ई-वे बिल देखील पाठवले. करण रांका व ट्रकचालक राकेश शर्मा असे नाव कथन करणा-या  दोघांनी विश्वास संपादन करुन भावेश पटेल यांच्याकडून वेळोवेळी एकुण 16 लाख 27 हजार 800 रुपये घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मोहनलाल पटेल यांनी सायबर पोलिस स्टेशनला फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. लिलाधर कानडे करत आहेत.    

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here