सौरभ यालकर सीए परिक्षा उत्तीर्ण

जळगाव दि.11 प्रतिनिधी – जैन उद्योग समूहातील व्यवस्थापक पदावरील वरिष्ठ सहकारी राजेंद्र यालकर यांचा मुलगा चि. सौरभ राजेंद्र यालकर याने नोव्हेंबर-२०२२ मध्ये सि.ए.(CA) परिक्षा दिली होती. या परिक्षेचा अंतिम निकाल लागला. यात सौरभने चांगल्या गुणांसह सीए ची परिक्षा उत्तीर्ण केली आहे.

सौरभच्या यशाबद्दल त्याचा परिवार,दिगंबर जैन समाजातील मान्यवर यांच्यासह सर्वस्तरातून त्याचे कौतूक होत आहे. तसेच जैन इरिगेशनच्या व्यवस्थापनाकडूनही त्याचे कौतूक झालेे. त्याने यापूर्वी बी.कॉमला 79 टक्के प्राप्त केले होते.  दिगंबर जैन समाजातील साधारण कुटुंबात वाढलेला  एक आदर्श विद्यार्थी सीए अंतिम परिक्षा उत्कृष्टरित्या उत्तीर्ण झाला याचा आनंद वडील राजेंद्र यालकर यांनी व्यक्त केला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here