देवेंद्र फडणवीस हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री – खा. नवनीत राणा

देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनात आमच्यासाठी मुख्यमंत्री आहेत. तुम्हीच महाराष्ट्राचा विकास करू शकता असं खा. नवनीत राणा यांनी म्हटले आहे. गोवा, गुजरात ज्या ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचे पाऊल पडले तिथे न्यायासाठी लढणारा व्यक्ती आपण पाहिला. त्यांच्या पाठिशी आपण सगळ्यांनी उभे राहिले पाहिजे असे देखील खा. नवनीत राणा यांनी म्हटले आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपण उपमुख्यमंत्री आहात. पण ज्या प्रकारे तुमच्या कामाचा आवाका आहे आणि तुम्ही ज्या प्रकारे आमच्या सगळ्यांची कामं करता ते पाहून आमच्या मनात आम्हाला हेच वाटतं की तुम्हीच आमचे मुख्यमंत्री आहात.

महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार 30 जून रोजी आले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत पक्षाला मोठे खिंडार पाडले. त्यानंतर भाजपासोबत एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होती अशा चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेतील ही घोषणा केली होती.

शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर सातत्याने देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख सुपर सीएम किंवा दुसरे मुख्यमंत्री असा केला जातो. अनेकदा आदित्य ठाकरेंनीही एकनाथ शिंदेंवर टीका करताना आपल्या राज्याला दोन मुख्यमंत्री आहेत एक मुख्यमंत्री आणि दुसरे स्पेशल मुख्यमंत्री असं म्हटलं आहे. आता खासदार नवनीत राणा यांनीही आमच्या मनात तुम्हीच मुख्यमंत्री आहात असं म्हटलं आहे. त्यामुळे नवनीत राणांचं हे वक्तव्य शिंदे मान्य होणार की त्यातून काही नाराजी व्यक्त होणार याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच शिंदे गटासोबत असलेले बच्चू कडू आणि आमदार रवी राणा या दोघांमध्येही वाद झाला होता. रवी राणा यांनी बच्चू कडूंवर खोके घेतल्याचा आरोप केला. तर बच्चू कडू यांनी रवी राणांना आव्हान देत मी खोके घेतले असतील तर तसं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करावं असं खुलं आव्हान दिलं. त्यावेळी भाजपा आणि शिंदे गटात वाद निर्माण झाला होता. आता नवनीत राणा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या वादाचा दुसरा अंक रंगू शकतो अशा शक्यता आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here