गांधी रिसर्च फाऊंडेशनची ग्राम संवाद सायकल यात्रा

जळगाव – गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने महात्मा गांधी पुण्यतिथी अर्थात हुतात्मा दिनी (दि. ३० जानेवारी) भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने गांधी विचार प्रचार-प्रसारासाठी भव्य अशा  “ग्राम संवाद सायकल यात्रे”चे आयोजन करण्यात आले आहे. १३ दिवस चालणारी हि यात्रा जळगाव जिल्ह्याच्या दक्षिण-पश्चिम भागातील जळगाव, एरंडोल, पारोळा, भडगाव, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर तालुक्यातून सुमारे ३५० किमीचा प्रवास करणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून एक लाख विद्यार्थी व नागरिकांशी संवाद साधण्यात येणार आहे.

समाजातील सहभागाने हि सायकल यात्रा यशस्वी करण्याचे नियोजन सुरु आहे. सायकल यात्रेत विविध राज्यातून येणारे व स्थानिक स्वयंसेवकांचा सहभाग असणार आहे. या सहभागी स्वयंसेवकांसाठी संबंधित कालावधीत वापरासाठी सायकलींची आवश्यकता आहे. आपणास विनंती आहे कि, आपल्याकडील चालू स्थितीतील व प्रवासासाठी योग्य सायकल उपलब्ध करून द्यावी. सायकल यात्रेनंतर आपणास आपली सायकल योग्य स्थितीत परत करण्यात येईल. सायकल वापरण्यायोग्य करण्यासाठी काही दुरुस्ती करावी लागणार असल्यास तसेही सांगावे.

सायकलसह यात्रेच्या मार्गावरील गावातील शाळा/महाविद्यालयात कार्यक्रम, स्थानिक पातळीवर रात्री गावकऱ्यांसाठी कार्यक्रमांचे आयोजन, सकाळी गावात प्रभात फेरीचे आयोजन आदी माध्यमातून स्थानिक नागरिक आपला सहभाग नोंदवू शकणार आहेत. तसेच सहभागी स्वयंसेवकांचा नाश्ता, दुपारचे व संध्याकाळचे जेवण आदी विषयातही आपला सहभाग नोंदवू शकणार आहे. अधिक माहितीसाठी सुधीर पाटील (९८२३३६२३३०) यांचेशी संपर्क साधावा.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here