सीए परिक्षेत देशभरातून अनुभूती स्कूलची सौम्या जाजू २८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण

जळगाव दि. 13 प्रतिनिधी – दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाच्या वतीने नोव्हेंबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या सीए परीक्षेचा अंतिम व इंटरमीडिएट परीक्षांचा निकाल जाहीर झाला. यामध्ये देशभरातून अनुभूती स्कूलची माजी विद्यार्थीनी सौम्या गिरिराज जाजू २८ व्या रॅंकने उत्तीर्ण झाले. 

अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत जळगाव येथील अनुभूति स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ कामगिरीची परंपरा कायम राखत नेत्रदीपक यश संपादन केले आहे.  सीए अंतीम नवीन कोर्स दोन्ही ग्रुपमधून सौम्या जाजू ही जळगाव शहरातून प्रथम तर भारतात २८ व्या क्रमांकाने सौम्या जाजू उत्तीर्ण झाली आहे. तसेच फायनलमध्ये अंशुमा लुंकड, अनिकेत अग्रवाल, जय मारू हे विद्यार्थीही उत्तीर्ण झाले तर विनित ठोले, सुरज चौधरी यांनी इंटरमीडिएट परीक्षेत यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल अनुभूतीस्कूलचे चेअरमन श्री. अतुल जैन व संचालिका सौ. निशा जैन यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे कौतूक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here