घरफोडीतील पाच आरोपींना अटक

जळगाव : पहुर पोलिस स्टेशन हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्यातील पाच संशयीत आरोपींना पहुर पोलिस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. 29 ऑगस्ट 2021 रोजी या घरफोडीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सय्यद सरजील सैय्यद हारुण (रा. मास्टर कॉलनी, जळगाव), अनिल रमेश चौधरी (रा. अयोध्या नगर, जळगाव, सैय्यद अराफत सैय्यद फारुख (रा. तांबापुरा, जळगाव), सय्यद आमीन ऊर्फ बुलेट सैय्यद फारुख रा. तांबापुरा, जळगाव आणि भावना जवाहरलाल जैन (लोढा) रा. रायसोनी नगर, जळगाव अशी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत.

अटकेतील भावना जैन हिचे नातेवाईक पहुर येथे राहतात. ते गावाला गेले असून त्यांच्याकडे भरपूर दागिने आणि रोकड असल्याची माहिती भावना जैन हिस समजली होती. या माहितीच्या आधारे सर्वांनी संगनमताने भावना जैन हिच्या पहुर येथील नातेवाईकांकडे घरफोडी करुन मुद्देमाल आपसात वाटून घेण्याचे ठरवले होते. ठरल्यानुसार भावना जैन वगळता तिचा पती अनिल चौधरीसह पाच जणांनी घरफोडी केली होती.

चोरीचा मुद्देमाल भावना जैन हिच्या ताब्यात देण्यात आला होता. याप्रकरणी पहूर पोलीस स्टेशनला गु.र.नं. 306/2021 भा.द.वि. 454,457,380 नुसार दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या अधिपत्याखाली असलेले अंगुली मुद्रा तंज्ञ स.पो.नि. वसंत कांबळे यांना घटनास्थळावरील चॅन्स प्रिंट मिळून आले. जळगाव जिल्ह्यातील रेकॉर्ड वरील गुन्हेगारांच्या चॅन्स प्रिंटच्या तपासणीअंती निष्पन्न आरोपी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीतील गुन्हेगारांची नावे जुळून आली.

पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील स.फौ. अनिल जगन्नाथ जाधव, सफौ रवि नरवाडे, पोहेकॉ संजय नारायण हिवरकर, पोहेकॉ विजयसिंग धनसिंग पाटील, पोहेकॉ राजेश बाबाराव मेंढे, पोहेकॉ सुधाकर रामदास अंभोरे, पोहेकॉ कमलाकर भालचंद्र बागुल, पोहेकॉ अनिल गणपतराव देशमुख, पोहेकॉ अक्रम शेख याकुब, पोना संतोष रामस्वामी मायकल, पोना नितीन प्रकाश बाविस्कर, पोना नंदलाल दशरथ पाटील, पोना विजय शामराव पाटील, पोना भगवान तुकाराम पाटील, पोना श्रीकृष्ण खंडेराव देशमुख, पो.ना.  परेश प्रकाश महाजन, पोकॉ विनोद सुभाष पाटील, सचिन प्रकाश महाजन, ईश्वर पंडीत पाटील, मपोहेकॉ अभिलाषा मुरलीधर मनोरे, मपोना वैशाली भागवत सोनवणे, मपोना अश्विनी जयेश सावकारे, मपोना उपाली यशवंत खरे आदींच्या पथकाने या गुन्ह्याच्या तपासकामी पाच गुन्हेगारांना अटक करण्यात यश मिळवले. अटकेतील आरोपींकडून गुन्हयातील मुद्देमालापैकी 16 लाख 90 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. पुढील तपासकामी अटकेतील आरोपींना पहुर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here