बेपत्ता महिलेचा जंगलात आढळला मृतदेह

जळगाव : यावल तालुक्यातील सातपुडा पर्वत परिसरात राहणा-या बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळून आल्याने यावल तालुक्यातील आदिवासी बांधवांमधे खळबळ उडाली आहे. करसना बारेला असे या मृतावस्थेत आढळलेल्या विवाहीत महिलेचे नाव आहे. 9 जानेवारीपासून करसना बारेला ही महिला बेपत्ता होती.

शोध घेतल्यानंतर देखील करसना बारेला सापडत नसल्यामुळे 12 जानेवारी रोजी याप्रकरणी मिसींग दाखल करण्यात आली होती. गाड-या जंगल परिसरात सापडलेला मृतदेह बघून हा घातपाताचा प्रकार असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. गाड-या गावचे पोलिस पाटील केरसिंग बारेला यांनी दिलेल्या खबरीनुसार यावल पोलिस स्टेशनला सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. पोलिस उप निरीक्षक प्रदीप बोरुडे पुढील तपास करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here