अ‍ॅड. प्रविण चव्हाण यांच्यासह सोनाळकर, पवार यांच्याविरुद्ध खंडणीच्या गुन्ह्याचा तपास पो.नि.नजनपाटील यांच्याकडे

जळगाव : सरकारी लोकसेवक पदाचा गैरवापर करुन गुन्ह्यात अडकवण्याची भिती घालून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अ‍ॅड. प्रविण चव्हाण यांच्यासह शेखर सोनाळकर आणी उदय पवार अशा  तिघांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात सुरज सुनिल झवर फिर्यादी आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.

बीएचआर मल्टीस्टेट को ऑप सोसायटी गैरव्यवहार प्रकरणात सुनिल झवर यांना जामीन मिळण्याकामी सहकार्य करण्याचे आश्वासन तसेच दोघा झवर  पिता पुत्रांना मोकाच्या गुन्ह्यात अडकवण्याची भिती घालून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी दाखल गुन्हा पुणे येथून चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे.

2 कोटी रुपयांच्या मागणीपैकी सुरज झवर याच्याकडून संगनमताने 1 कोटी 22 लाख रुपये चाळीसगाव येथील उदय पवार यांच्या मालकीच्या ओरिजनल वाईन शॉप येथे वसुल करण्यात आल्याचे म्हटले आहे. या रकमेपैकी 1 कोटी रुपये अ‍ॅड. प्रविण चव्हाण यांनी तर 20 लाख रुपये मध्यस्ती करण्याच्या आणि 2 लाख रुपये हवालाच्या मोबदल्यात घेतल्याचे म्हटले आहे. अ‍ॅड. चव्हाण, उदय पवार आणि शेखर सोनाळकर यांच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 25/23 भा.द.वि. 384, 385, 388, 386, 166, 213, 506, 120 (ब), 34 या कलमानुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here