जैन इरिगेशनचा  मॉडर्न  प्लास्टिक्स  इंडिया अ‍ॅवार्ड ने मुंबईत गौरव


जळगाव, दि. 23, (प्रतिनिधी)
:  जैन इरिगेशनच्या कार्याला अधोरेखीत करून  मॉडर्न प्लॅस्टिक्स इंडियातर्फे  “मॉडर्न प्लॅस्टिक्स इंडिया अ‍ॅवार्ड 2023” भारतातील अत्याधुनिक ठिबक सिंचन प्रणालींचे उत्पादक या प्रकारातगोल्ड कॅटेगरीसाठीचा पुरस्कार नुकताच प्रदान केला गेला.  हा सोहळा मुंबईच्या  जेडब्ल्यू मॅरियटला पार पडला. कंपनीच्यावतीने मुंबई कार्यालयाचे सहकारी सिनियर व्हाईस प्रेसिडेंट  (बँकिंग अँड फायनान्स) आर. बी. देशमुख यांनी स्वीकारला. या सोहळ्यास जगभरातील निवडक प्लास्टिक उदयोगातील उद्योजक, सरकारी अधिकारी, विविध कंपन्यांचे अधिकारी व प्रतिनिधी, संशोधक आणि निर्यातदार व आयातदार मान्यवर उपस्थित होते.

कृषी क्षेत्रातील अग्रगण्य व लौकीक प्राप्त जैन इरिगेशन ही  कंपनी आपली विविध उत्पादने शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहे. अत्याधुनिक सिंचन प्रणाली, उच्च तंत्रज्ञान, अॅग्रोनॉमिस्ट सपोर्ट करीत असते. परिणामी शेतकऱ्यांचे पिकांचे उत्पादन आणि उत्पन्न दोघांमध्ये दुप्पटीहून अधिक वाढ झालेली आहे. विश्वातील कृषी क्षेत्रामध्ये प्रिसीजन फार्मिंग व प्लास्टिकल्चरचा चपखल उपयोग शेतकरी करीत आहेत.

भारतातील  प्लास्टिक उद्योगातील सकारात्मक बदल घडविणाऱ्या कंपनी संस्थापक, कंपन्यांचे नेते आणि उदयोजकांना प्रामुख्याने देण्यात येतो.  मॉडर्न प्लास्टिक इंडिया हे एक अग्रणी मासिक आहे. त्यामध्ये जगभरातील प्लास्टिक विश्वातील घडामोडी प्रकाशीत होतात. जिनु जोसेफ हे मॉडर्न  प्लास्टिकग्लोबल नेटवर्कचे सीईओ आणि मुख्य संपादक असून त्यांच्या संकल्पनेतून हे पुरस्कार दिले जातात.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here