जळगाव शहरातील पाच आरोपींवर मोक्काची कारवाई

जळगाव : एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील पाच आरोपींवर मोक्का कायद्याखाली कारवाई करण्यात आली आहे. मोनुसिंग जगदिशसिंग बावरी, मोहनसिंग जगदिशसिंग बावरी, सोनुसिंग जगदिशसिंग बावरी, जगदिशसिंग हरिसिंग बावरी, सतकौर जगदिशसिंग बावरी (सर्व रा. सदगुरु कॉलनी, शिरसोली नाका, जळगाव) अशी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत. या पाच जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गु.र.नं. ७६९/२०२२ भादंवि क. ३०२, ३०७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, १२०(ब) प्रमाणे दि. २६/१०/२०२२ रोजी गुन्हा दाखल आहे. या गुन्हयांतील आरोपीतांनी यापूर्वी टोळीने आर्थिक फायदयासाठी बरेच गुन्हे केले आहेत. एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या अभिलेख्यावर तशी नोंद आहे. 

पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उप विभागीय पोलिस अधिकारी संदिप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. जयपाल हिरे यांना या टोळीविरुद्ध दाखल गुन्ह्यात मोक्का कायदयाचे कलम वाढवण्यासह प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या.

त्यानुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. जयपाल हिरे यांनी तयार केलेला मोक्का प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेच्या मार्फत पोलिस अधिक्षक यांच्याकडे सादर केला. पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी या प्रस्तावाचे अवलोकन तो प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्याकडे सादर केला.

या गुन्हयांत महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३ (१) (II), ३(२), ३ (४) (मोक्का) हे कलम लावण्याची परवानगी वरिष्ठ स्तरावरुन मिळाल्याने एमआयडीसी पो.स्टे.ला दाखल गुन्हयांतील पाचही आरोपीतांवर मोक्का कायदयाखाली कलम लावण्यात आले. या प्रस्तावाच्या निर्माणकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्यासह त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार सहायक फौजदार युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे तसेच एमआयडीसी पो.स्टे. चे पो.नि. जयपाल हिरे, पोउनि रविंद्र गिरासे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ सचिन मुंडे, पोना योगेश बारी, पोना सचिन पाटील यांनी योगदान दिले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here