विनयभंगप्रकरणी आरोपीला सहा महिने कारावासाची शिक्षा

जळगाव : घरामध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी विलास जुलाल भिल याला जळगाव न्यायालयाने सहा महिने कारावासासह दंडाची शिक्षा सुनावली आहे. 3१ मार्च २०१४ रोजी रात्री जळगाव तालुक्यातील एका गावात महिला घरामध्ये झोपलेली होती. तेव्हा विलास भिल याने अनधिकृतपणे घरामध्ये प्रवेश करून महिलेचा विनयभंग केला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. हा खटला न्या. पी. आर. वागडोळे यांच्या न्यायालयात सुरु होता.

सरकारपक्षातर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले. या चारही साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. या प्रकरणात न्यायाधीश वागडोळे यांनी विलास भिल याला दोषी ठरवून शिक्षा सुनावली. त्यात भादंवि 3५४ (अ) प्रमाणे सहा महिने शिक्षा व भादंवि ४४८ प्रमाणे २ महिन्यांची आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अँड. प्रिया मेढे यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून भगवान आरखे व विलास पाटील यांनी कामकाज पाहिले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here