जळगाव : एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक करण्यात आली आहे. सागर आकाश दहेकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध आर्म अॅक्टचा गुन्हा देखील नोंदवण्यात आला होता.
सुनिल शेषराव पाढाळे (रा.सहयोगनगर,हिवरखेडा रोड जामेनर जि जळगाव) हा तरुण 22 मार्च 2022 रोजी वराड ते विटनेर रस्त्याने जात असतांना त्याच्या ताब्यातील 1 लाख 14 हजार 629 रुपये रोख, मोबाईल टॅब आणि मोबाईल असा ऐवज हिसकावून घेण्यात आला होता. गुन्हा घडल्यापासून सागर आकाश दहेकर हा फरार होता.
तो जळगाव शहरातील जाखनी नगर भागात आला असल्याची गोपनीय माहिती पो.नि.जयपाल हिरे यांना समजली होती.
त्या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलिस उप निरीक्षक आनंदसिंग पाटील,पोहेकॉ गणेझ शिरसाळे, पोना विकास सातदिवे, किशोर
पाटील,योगेश बारी आदींनी त्याला सापळा रचून अटक केली. पुढील तपास स.पो.नि. अमोल मोरे व त्यांचे सहकारी हे.कॉ. रतीलाल पवार करत आहेत.