लॉकडाऊन काळात केली नोटांची छपाई – अनलॉक काळात झाली पोलिस कारवाई

Rs. 2000 currency image

पिंपरी चिंचवड : लॉकडाऊन काळात दोघा जणांनी संधीचा फायदा घेत दोन हजाराच्या बनावट नोटांच्या छपाईचा उद्योग सुरु केला होता. मात्र अनलॉक काळात पोलिसांनी त्यांना तिन लाखांच्या मुद्देमालासह अटक केली.

पिंपरी चिंचवडमधील निगडी परिसरात या छपाईचा भंडाफोड झाला. लॉकडाऊन काळात आपल्याकडे कुणी येणार नाही याची खात्री असल्यामुळे दोघा तरुणांनी घरातच दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई सुरु केली होती. अनलॉक सुरु झाल्यानंतर अचानक बाजारात दोन हजाराच्या नोटा येवू लागल्याने व्यापारी वर्गात संशयाचे वातावरण निर्माण झाले होते.

पिंपरी चिंचवड परिसरातील या प्रकाराची कुणकुण खब-यामार्फत पोलिसांपर्यंत गेली. पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे व त्यांच्या पथकाने छापा टाकत दोघा तरुणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून तिन लाख रुपयांच्या नोटा, छपाईसाठी लागणारे प्रिंटर जप्त करण्यात आले. चौकशीअंती दोघांना पुणे येथील एका मित्राने मदत केली असल्याचे उघड झाले. पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here