परिक्षा वारंवार पुढे ढकलणे योग्य नाही – सुप्रीम कोर्ट

सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : महत्त्वाच्या परीक्षा वेळोवेळी पुढे ढकलून विद्यार्थ्यांचे करिअर दीर्घकाळ टांगणीवर ठेवता येत नाही असे मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केले. जेईई, नीट आणि जेईई अ‍ॅडव्हान्स या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याबाबतची याचिका ११ विद्यार्थ्यांनी केली होती. ती फेटाळत असतांना सर्वोच्च न्यायालयाने हे मत नोंदवले. न्या. अरुण मिश्रा, न्या. भूषण गवई व न्या. कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठाने या प्रकरणी म्हटले आहे की, महत्त्वाच्या परीक्षा वारंवार पुढे ढकलण्यामुळे विद्यार्थ्यांचे करियर टांगणीवर ठेवले जाते, तसे करता येत नाही. वर्ष वाया घालवण्याची तुमची तरी तयारी आहे का? असे याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारत न्यायमूर्ती म्हणाले की, परिस्थिती अडचणीची जरी असली तरी जीवन व्यवहार ठप्प राहू शकत नाहीत. योग्य ती काळजी घेऊन ते चालूच ठेवावे लागतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here