ट्रॅक्टर अंगावर घालुन ठार करणा-या मुख्य आरोपीस अटक

जळगाव : अंगावर ट्रॅक्टर घालून तरुणास ठार करणा-या मुख्य संशयीत आरोपीस मारवड पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. अशोक लखा कोळी रा. मांडळ ता. अमळनेर असे अटक करण्यात आलेल्या मुख्य संशयीत आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यातील सात पैकी सहा संशयीत आरोपींना यापुर्वीच अटक करण्यात आली आहे. या घटने प्रकरणी मारवड पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न.302, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्य संशयीत आरोपी अशोक लखा कोळी हा गुन्हा घडल्यापासून त्याची ओळख लपवून फरार झाला होता. मारवड पोलिस स्टेशनचे सपोनि जयेश खलाणे, पोउपनिरी श्री विनोद पाटील, पोह संजय पाटील, सुनिल आगोणे, पोना सुनिल तेली, पोकॉ तुषार वाघ, अनिल राठोड, उज्वल पाटील, दिनेश पाटील आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here