रस्त्यावरील पैसे उचलण्याच्या मोहात गमावले विस हजार

जळगाव : दुकानाच्या बाहेर तुमचे पैसे पडले आहे ते उचलून घ्या असे एका मुलाच्या सांगण्यावरुन दुकान सोडून जाणा-या दुकानदारास दुकानातील विस हजार रुपये गमावण्याची वेळ आली. विस हजार रुपयांसह बॅंक पासबुक, दुकानाचे खरेदीखत, दुकानाची आणी मोटार सायकलची चावी असा इतर ऐवज देखील मुक्ताईनगर येथील या घटनेत चोरी झाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात महेंद्र गावंडे यांचे वडापाव आणि शितपेय विक्रीचे दुकान आहे. 4 मार्च रोजी नेहमीप्रमाणे गावंडे हे दुकानात बसले असतांना एक अनोळखी मुलगा त्यांच्या दुकानात आला. दुकानाच्या बाजुला रस्त्यावर तुमचे पैसे पडले आहेत असे त्या मुलाने त्यांना म्हटले. आपलेच दुकानातील पैसे पडले असावेत असा समज करत गावंडे ते पैसे उचलण्यास दुकान सोडून गेले.

त्या कालावधीत त्यांच्या दुकानातील विस हजार रुपये, दुकानाचे खरेदीखत, बॅंकेचे पासबुक, चेक बुक, दुकानाची आणि मोटार सायकलची चावी असा ऐवज चोरी झाला. पैसे उचलून  दुकानात आल्यानंतर गावंडे यांच्या लक्षात हा प्रकार आला. दरम्यान पैसे पडल्याचे सांगणारा मुलगा तेथून गायब झालेला होता.  याप्रकरणी महेंद्र गावंडे यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक उमेश महाजन करत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here