पोलिस अधिक्षक कार्यालय परिसरात गोंधळ घालणा-या तरुणांविरुद्ध गुन्हा

जळगाव : पोलिस अधिक्षक कार्यालय परिसरातील महिला सहाय्य कक्षानजीक जोरजोरात बोलून एकमेकांच्या अंगावर धावून जाणा-या आठ जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक्षककार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या महिला सहाय्य कक्ष नजीक हा प्रकार 15 मार्च रोजी घडला.

गौरव समाधान सोनवणे (रा. गुजराल पेट्रोल पंपाजवळ जळगाव), प्रसाद कमलाकर पाटील (रा. निवृत्ती नगर जळगाव), मोहीत संदीप पाटील (रा. संत मिराबाई नगर पिंप्राळा शिवार जळगाव), प्रथमेश सुरेश साळुंखे (रा. ओमशांती नगर जळगाव), खुशाल गोकुळ पाटील (रा. आहुजा नगर निमखेडी शिवार जळगाव), निरज जितेंद्र सुर्यवंशी (रा. आर. एल कॉलनी पिंप्राळा जळगाव), निर्भय शितल शिरसाठ (रा. प्रबुद्ध नगर पिंप्राळा जळगाव) आणि तेजस सुहास गोसावी (रा. दादावाडी मंदीराजवळ जळगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या तरुणांची नावे आहेत.  क्षुल्लक कारणावरुन मोठमोठ्याने आरडाओरड करत सार्वजनीक शांततेचा भंग केल्याप्रकरणी हे.कॉ. जितेंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस नाईक राजेश पदमर करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here