विषारी औषध डोळ्यात गेल्याने महिलेचा मृत्यू

जळगाव : केळी पिकावर फवारण्याचे विषारी अळीनाशक औषध पंपात भरुन देत असतांना डोळ्यात गेल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. जळगाव तालुक्यातील नंदगाव शिवारात घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जिजाबाई विश्वनाथ सोनवणे असे मयत महिलेचे नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की 2 मार्च रोजी जिजाबाई सोनवणे (55) ही महिला केळी पिकावर फवारणी करण्याचे विषारी औषध पंपात भरुन देत होती. दरम्यान फवारणीचे औषध पंपात भरुन देत असतांना ते औषध तिच्या डोळ्यात आणि अंगात जावून तिला विषबाधा झाली. घटना घडल्यानंतर जिजाबाई सोनवणे हिच्यावर वैद्यकीय उपचार सुरु होते. उपचार सुरु असतांना 17 मार्च रोजी जिजाबाई सोनवणे या महिलेचे निधन झाले. या घटनेप्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली आहे. पोलिस उप निरीक्षक नयन पाटील या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here