ओटीपी विचारुन तरुणाची 59 हजार रुपयात फसवणूक

जळगाव : ओटीपी विचारुन अमळनेर तालुक्यातील तरुणाची 59 हजार 449 रुपयात फसवणूक झाली आहे. याप्रकरणी मारवड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल शिवाजी पाटील रा. निम ता. अमळनेर असे फसवणूक झालेल्या शेतकरी तरुणाचे नाव आहे.

सुनिल पाटील या तरुणाला 1 मार्च रोजी अनोळखी क्रमांकावरुन अनोळखी व्यक्तीचा त्याच्या मोबाईलवर फोन आला. आपण बॅंकेतून बोलत असल्याचे खोटे सांगून पलीकडून बोलणा-याने त्याला मोबाईलवर आलेला ओटीपी विचारला. सुनिल पाटील याने अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवत त्याला ओटीपी सांगितला. ओटीपी मिळताच पलिकडून बोलणा-या व्यक्तीने सुनिल पाटील याच्या क्रेडीट कार्ड वर त्याच्या संमतीवाचून स्वत:ची ओळख लपवून 59 हजार 449 रुपयांची शॉपींग करुन ऑनलाईन फसवणूक केली.

याप्रकरणी 22 मार्च रोजी मारवड पोलिस स्टेशनला फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास अमळनेर पोलिस स्टेशनचे प्रभारी विजय शिंदे करत आहेत. कुणीही अनोळखी क्रमांकावरुन आलेल्या अनोळखी व्यक्तीला ओटीपी अथवा बॅंकेचा तपशील देवू नये तसेच अनोळखी लिंकवर क्लिक करु नये असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. बॅंक कुणाही ग्राहकाला ओटीपी विचारत नसते.    

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here