भरधाव क्रेनच्या चाकाखाली महिलेचा मृत्यु

जळगाव : भरधाव क्रेनच्या चाकाखाली आल्याने पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास एमआयडीसी परिसरात घडली. या घटनेने परिसरात खळबळ माजली होती. रंजना उत्तम येसे असे मरण पावलेल्या विवाहितेचे नाव आहे. कपड्यांना इस्त्री करुन रंजना येसे आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होत्या.

एमआयडीसी परिसरातील राका फर्निचर ते म्हाडा कॉलनी दरम्यान रंजना येसे या घराच्या दिशेने पायी जात होत्या. त्याचवेळी एमएच 40 पी 2309 या भरधाव वेगातील क्रेनने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्या क्रेनच्या पुढील डाव्या चाकाखाली आल्याने मरण पावल्या. घटना घडताच क्रेन चालक फरार होण्यात यशस्वी झाला. रंजना येसे यांना लागलीच रिक्षाने सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिका-यांनी त्यांना मयत घोषित केले. या घटने प्रकरणी क्रेन चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here