सतरा वर्ष वयोगट – बुद्धीबळ चाचणी स्पर्धेत जयेश सपकाळे प्रथम

जळगांव : जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने ३० मार्च गुरुवार रोजी १७ वर्षे वयोगटातील बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली होती. सहा फेऱ्या घेण्यात आल्या या स्पर्धेत १७ वर्षातील वयोगटात जळगावच्या जयेश सपकाळे याने सहा पैकी साडेपाच गुण घेत सरस टायब्रेकच्या आधारे प्रथम क्रमांक पटकावला तर पाचोरा येथील वैभव पाटील याने साडेपाच गुण घेत दुसरा क्रमांक पटकाविला. तर तिसरा क्रमांक श्रेयस उपासनी पाच गुण घेत पटकावला.

तर मुलींच्या वयोगटात पाचोर्‍याची ऋतुजा बालपांडे हिने तीन गुण घेत प्रथम क्रमांक पटकावला स्पर्धेचे बक्षीस खेळाडूंना जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव नंदलाल गादिया, राष्ट्रीय खेळाडू चंद्रशेखर देशमुख, नथू सोमवंशी यांच्या हस्ते देण्यात आले सदर स्पर्धा कांताई सभागृहात घेण्यात आल्या. तसेच उत्तेजनार्थ बक्षीस तेरा वर्षे वयोगटात युग कोटेचा भुसावळ, आर्य कुमार शेवाळकर पाचोरा दुर्वेश कोळी जळगाव सोहम चौधरी भुसावळ दर्शन पाटील भुसावल यांना देण्यात आले तर अकरा वर्षे वयोगटात हिमांशू सरोदे भुसावल प्रथम नक्ष झवर जळगाव द्वितीय चरण नाईक पाचोरा नऊ वर्ष गटात रोनित बालपांडे पाचोरा रुजूल सरोदे भुसावल तर सात वर्षे वयोगटात समर्थ पोळ जळगाव यांना देण्यात आले

निवड झालेले खेळाडू बुलढाणा येथे दिनांक १४ ते १६ एप्रिल २०२३ दरम्यान होणाऱ्या १७ वर्षातील राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी बुध्दिबळ स्पर्धेसाठी निवड झालेली आहे स्पर्धेत पंच म्हणून प्रवीण ठाकरे,नथू सोमवंशी, परेश देशपांडे,सोमदत्त तिवारी यांनी काम पाहिले. विजय खेळाडूंचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन व पदाधिकारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here