सोन्याच्या भावात पुन्हा घसरण

गत आठवड्यापासून सोन्याच्या भावात चांगलीच घसरण झाल्याचे चित्र आपल्याला दिसून आले. मंगळवारी सोन्याच्या भावात वाढ झाली होती. मात्र आता सोन्याच्या किमतीत पुन्हा कमी आली आहे. मंगळवारी 5 ऑक्टोबरच्या वायदे बाजारात सोन्याची किंमत 53,571 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढी होती. आज पुन्हा यात 121 रुपयांची घसरण झाली आहे.

सोन्याच्या वायदे बाजाराचा शुभारंभ 53,450 रुपये प्रति तोळा या किमतीने झाला. सोन्याच्या भावातील घसरण अजुन सुरुच आहे. त्यामुळे गुंतवणूकदार संभ्रमात आहेत. आज बाजार सुरु झाल्यानंतर काही मिनिटातच सोन्याच्या भावात 350 रुपयांची घट झाली. हा भाव 53,125 रुपयांच्या किमान स्तरावर जाऊन पोहोचला.
आर्थिक मंदीसह अमेरिका-चीनमधील वाढता तणाव तसेच डॉलरची घसरण हे सर्व घटक सोन्याच्या दरात वाढ होण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुंतवणूदार देखील सोने, चांदीकडे आकर्षित होत असले तरी कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here