सुलेमानी पत्थर देण्याचा बहाणा – हिसकावल्या सोन्याच्या चार अंगठ्या

जळगाव : सुलेमानी पत्थर विकत देण्याचा बहाणा करुन बोलावलेल्या इसमाकडून सोन्याच्या एक लाख रुपये किमतीच्या चार अंगठ्या आणि खिशातील 62 हजार रुपये रोख हिसकावण्याचा प्रकार मुक्ताईनगर तालुक्यात कु-हा हद्दीत उघडकीस आला आहे. या घटनेप्रकरणी मुक्ताईंगर पोलिस स्टेशनला सात जणांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कधी नागमणी, कधी सुलेमानी पत्थर विक्रीच्या नावाखाली बोलावून अशा लुटमारीच्या घटना मुक्ताईनगर तालुक्यात वेळोवेळी घडत असतात. परराज्यातील लोकांच्या बाबतीत असे प्रकार कित्येकदा घडत असतात.

शेख युनुस शेख कादर बादशहा या भंगार व्यावसायीकाच्या बाबतीत मुक्ताईनगर तालुक्क्यातील लालगोटा या गावी संशयित आरोपींच्या घरात हा प्रकार घडला आहे. शेख युनुस हे श्रीनिवासन पुरुम तिरुपती जिल्हा चित्तुर आंध्र प्रदेशातील रहिवासी आहेत. 17 एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. अक्काबाई जोगिंदर भोसले,  शिवदत्त जोगिंदर भोसले, दयाल जोगिंदर भोसले, जोगिंदर राजवंती भोसले, शिवकिसन जोगिंदर भोसले, रितु मंटूस पवार आणि कृष्णा भोसले (सर्व रा. लालगोटा मुक्ताईनगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. सहायक पोलिस निरीक्षक संदीप दुनगहू पुढील तपास करत आहेत.    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here