दुश्मनाला दवाखान्यात अ‍ॅडमीट केले म्हणून घडली गोळीबारीची घटना?

जळगाव : आपल्या दुश्मनाला दवाखान्यात अ‍ॅडमीट केल्याचे मित्रांनी पाहीले तेव्हापासून चेतन आळंदे याच्या मनात धुमसत असलेल्या रागाची परिणीती आजच्या आसोदा येथील गोळीबारात झाल्याचे म्हटले जात आहे. आसोदा येथे आज मध्यरात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेत अटक करण्यात आलेला चेतन उर्फ चिंग्या आळंदे हा पोलिसांच्या रेकॉर्ड वरील हद्दपार करण्यात आलेला गुन्हेगार आहे. जळगाव शहर आणि जळगाव तालुक्यातून त्याला हद्दपार करण्यात आले आहे.

लखन ऊर्फ गोलू मराठे हा चेतन ऊर्फ चिंग्या याचा जवळचा मित्र असल्याचे म्हटले जाते. तसेच ललित उर्फ सोनू गणेश चौधरी हा योगेश कोल्हे याचा खास मित्र आहे. चिंग्याचा मित्र लखन मराठे याने काही महिन्यांपुर्वी जळगाव शहरातील शिवाजी पुतळा परिसरात केलेल्या तलवार हल्ल्यात योगेशचा मित्र ललित उर्फ सोनू चौधरी यास जखमी केले होते. आपला दुश्मन अर्थात ललित चौधरी यास योगेश कोल्हे  याने वैद्यकीय उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. ही बाब चिंग्याच्या काही मित्रांनी चिंग्याजवळ कथन केली होती. आपल्या दुश्मनाला दवाखान्यात दाखल करण्याकामी मदत करणा-या योगेश कोल्हे याचा काटा काढण्याचा प्लान गोळीबारीच्या घटनेतून उघड झाल्याचे म्हटले जात आहे.

गुंडगिरी मोडीत काढण्याचे आव्हान या गोळीबाराच्या घटनेच्या निमीत्ताने जळगाव पोलिस अधिक्षकांना दिल्याचे देखील म्हटले जात आहे. याशिवाय दररोज होणा-या चो-या आणि घरफोड्या देखील थांबत नसल्याने जळगावकर नागरिकांमधे रोष निर्माण झाला आहे. मध्यरात्री जळगाव शहरात फेरफटका मारला असता रात्र गस्तीचे पोलिस कर्मचारी दिसत नसल्याची देखील ओरड होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here