आगग्रस्त दुकानदाराच्या मदतीसाठी सरसावले दात्यांचे हात

जळगाव : काही दिवसांपूर्वी जळगाव शहरातील गणपती नगर परिसरात लागलेल्या आगीत किराणा दुकान जळून खाक झाले. आगीत दुकान जळून खाक झाल्याने हवालदील झालेले दुकानदार राजेंद्र खिवंसरा यांना एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार अतुल वंजारी यांनी मदतीचा हात दिला. त्यांनंतर अजून काही दाते किराणा दुकानदार राजेंद्र खिवंसरा यांच्या मदतीला सरसावले आहेत.

नेहमी गोरगरिबांच्या मदतीला धावून येणा-या नगरसेविका अनुताई कोळी आणि लीलाताई सोनवणे यांनी राजेंद्र खिवंसरा यांना मानसिक आणि आर्थिक आधार दिला आहे. त्यांच्यासह हिंदू मुस्लिम एकता मंचातर्फे मिळून 3600 रुपयांची मदत आज जमा झाली. नगरसेवक राजेंद्र कोळी यांच्यातर्फे रुपये 1100, वसीम बापू यांच्यातर्फे रुपये 1000, ललित शर्मा यांच्यातर्फे रुपये 500, नगरसेविका सौ. लीलाताई सोनवणे व अनुताई कोळी यांच्यातर्फे 1000 रुपयांची एकत्रीत मदत मिळाली आहे. याप्रसंगी आसिफ शाह बापू, पोलिस बॉईज अनिल सोनवणे आदी उपस्थित होते. अग्निशमन दलाच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले होते. तीस वर्षापासून ज्या दुकानाच्या बळावर बहिणीसह भाचीचा आणि स्वत:चा उदरनिर्वाह करण्यात आला ते दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्याचे पाहून दुकानदार राजेंद्र खिवंसरा मनातून पार खचले होते.
  

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here