लॉकअप मधील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगाव : लॉकमधील आरोपीने भिंतीवर डोके आपटून स्वत:ला जखमी करुन घेत आत्महत्येचा प्रयत्न करणा-या संशयीत आरोपीविरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल देविदास सरदार (रा. राजीव गांधी नगर पारोळा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे.

राहुल उर्फ राजू देविदास पवार यास अटक केल्याचा राग आल्याने त्याने संतापाच्या भरात भिंतीवर डोके आपटून घेत गार्ड रुम मधील लोखंडी पलंगाच्या पट्टीट हात घालून जखम करुन घेतली. त्याला लागलीच कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेप्रकरणी पारोळा पोलिस स्टेशनला गार्ड अंमलदार आशिष गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस नाईक योगेश जाधव करत आहेत.    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here