पोलिस माझे काहीच वाकडे करु शकत नाही म्हणणा-या चिंग्याविरुद्ध गुन्हा

जळगाव : गणवेशातील पोलिसाच्या शर्टाची कॉलर पकडून पोलिस माझे काहीच वाकडे करु शकत नाही म्हणणा-या गोळीबार प्रकरणातील व सध्या अटकेतील चिंग्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अजून एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव तालुका पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले पोलिस नाईक ज्ञानेश्वर दोधू कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आसोदा येथील गोळीबार प्रकरणातील संशयीत आरोपी तथा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार चेतन आळंदे याला गोळीबार घटनेबाबत पो.नि.रामकृष्ण कुंभार व पोलिस उप निरीक्षक नयन पाटील विचारपुस करत होते. त्यावेळी त्याच्यावर लक्ष ठेवण्याकामी शासकीय गणेवेशात हजर असलेले पोलिस नाईक ज्ञानेश्वर कोळी यांची कॉलर त्याने अचानक ओढण्यास सुरुवात केली. तुम्ही पोलिस माझे काहीच वाकडे करु शकत नाही. मी आत्ताच खूनाच्या गुन्ह्यातून जामीनावर सुटून आला आहे. मी तुम्हा सर्वांना बघून घेईन. मला आताच्या आता बाहेर सोडा असे चिंग्या मोठ्याने ओरडू लागला. या झटापटील पोलिस नाईक कोळी यांच्या शर्टाचे वरील बटण व नेमप्लेट तुटली. तसेच त्याच्या नखाचे ओरखडे लागले. या घटने प्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक नयन पाटील  करत आहेत.      

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here