मामासोबत लस्सी पिण्यास आलेल्या भाचीला पळवले

जळगाव : बाजार केल्यानंतर गारवा मिळवण्यासाठी लस्सी पिण्यासाठी मामाने आणलेल्या दोघांपैकी एका भाचीला कुणीतरी पळवून नेल्याची घटना जामनेर शहरात उघडकीस आली आहे. आपल्या भाचीला कुणीतरी फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध जामनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटने प्रकरणी सविस्तर वृत्त असे की जामनेर परिसरात राहणा-या दोघा अल्पवयीन मुलींचे छ्त्रपती संभाजीनगर येथे राहणारे मामा जामनेर येथे आले होते. दोघा भाच्यांना मामाने बाजारात आणले होते. बाजार केल्यानंतर सहज मनाला आणि शरीराला गारवा मिळवण्यासाठी मामाने दोघींना भुसावळ रस्त्यावरील लस्सीच्या गाडीवर लस्सी पिण्यासाठी आणले. दरम्यान मामाची नजर चुकवून पंधरा वर्ष सहा महिन्याच्याभाचीला कुणीतरी फुस लावून पळवून नेले. आपली भाची बेपत्ता झाल्यानंतर लस्सीच्या दुकानावरील मामा हवालदिल झाला. त्याने आपली भाची कुणीतरी फुस लावून पळवून नेल्याप्रकरणीजामनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला. हे.कॉ. अनिल चाटे पुढील तपास करत आहेत.        

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here