पेट्रोल पंप मालकास लुटणा-यास अटक

जळगाव : तिन वर्षापुर्वी पेट्रोल पंप मालकाची लुट करणा-यास अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या गुन्ह्याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. भिकन ऊर्फ पिंटू बादशहा तडवी असे अटक करण्यात आलेल्या संशयीत गुन्हेगाराचे नाव आहे. गु.र.नं. २१४/२०२० भा.दं.वि. ३४१, ३९४ प्रमाणे दि. २३/०९/२०२० रोजी गुन्हा हा गुन्हा दाखल झाला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील पोलीस अंमलदार पोहेकॉ विजयसिंग धनसिंग पाटील, पोहेकॉ सुधाकर रामदास अंभोरे, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकॉ लक्ष्मण अरुण पाटील, पोहेकॉ महेश आत्माराम महाजन, पोना प्रमोद अरुण लाडवंजारी, पोना प्रितम पिंताबर पाटील, पोना महेश पाटील, पो. कॉ. उमेशगिरी गोसावी, चापोकॉ. महेश पाटील आदींनी पिंपळगाव हरेश्वर गावी जावून या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपासकामी संशयीत आरोपीस पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here