ट्रक चालकाचे हातपाय बांधून लुटमारीनंतर दिले फेकून

जळगाव : ट्र्क चालकाचे हातपाय बांधून त्याला बेदम मारहाण करत लुटमार करुन काही अंतरावर त्याच्या ताब्यातील ट्रक नेवून त्याला तशाच अवस्थेत फेकून दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटने प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रं. 211 वरील कन्नड ते चाळीसगाव रस्त्यावरील घाटाच्या खाली 30 एप्रिल रोजी दिड वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. सोमवीर रामफलसिंग जाट (रोहतक हरियाणा) आणि नुर मोहंमद युनुस कक्कल (जामनगर गुजरात) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

आसाम राज्यातील लखीचंद जोधू बोरा या तरुणाच्या ताब्यातील ट्रकमधे सोमवीर रामफलसिंग जाट, नुर मोहंमद कक्कल, मामू (रा. डिसा गुजरात), व चार अनोळखी इसमांनी लखींदर जोधू बोरा याच्या ताब्यातील ट्रकमधे चढून त्याच्या नाकातोंडावर हाताबुक्क्यांनी मारहाण केली होती. तसेच त्याचे हातपाय दोराने बांधून त्याला ट्रकमधेच डांबून ठेवण्यात आले. ट्रक काही अंतरावर नेवून त्याला हातपाय बांधलेल्या अवस्थेत मोहाडी नगर पोलिस स्टेशन हद्दीत चाळीसगाव ते धुळे रस्त्यावर गरताड गावाच्या पुढे फेकून देण्यात आले. त्यानंतर ट्रकसह त्यांनी पलायन केले. मोहाडी नगर पोलिस स्टेशन धुळे येथे शुन्य क्रमांकाने दाखल गुन्हा नंतर चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव पुढील तपास करत आहेत.    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here