पावणेदोन लाखाची रोकड चोरी

जळगाव : गोडाऊनच्या खिडकीचे लॉक तोडून बांबूने दरवाजाची आतील कडी उघडून प्रवेश करत पावणेदोन लाख रोख रक्कम चोरुन नेल्याप्रकरणी भडगाव पोलिस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय ऑफीससह गोडाऊनमधील इतर ठिकाणी देखील चोरीचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले आहे.

भडगाव येथील गंगाई इंडस्ट्रीजच्या गोडाऊनमधे 17 मे च्या रात्री ते 18 मे च्या सकाळ दरम्यान हा चोरीचा प्रकार झाला आहे. भडगाव येथील देशमुख वाडा येथील तुषार अवधूत देशमुख यांनी भडगाव पोलिस स्टेशनला या घटने प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गु.र.न. 138/23 भा.द.वि. 454, 457, 380, 511 नुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक चंद्रसेन पालकर करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here