दरोडा घालण्याच्या तयारीतील चौघांसह दोघे अल्पवयीन ताब्यात

जळगाव : दरोडा घालण्यासह रस्ता लुटीच्या तयारीत असलेल्या चौघा तरुणांसह दोघाअल्पवयीन मुलांना त्यांच्याकडील लुटीच्या साहित्यासह अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. जयपाल हिरे यांच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या कारवाईत चौघे तरुण आणी दोन अल्पवयीन अडकले आहेत. स्वप्नील उर्फ गोल्या धर्मराज ठाकुर, निशांत प्रताप चौधरी (दोघे रा. शंकरराव नगर डीएनसी कॉलेज जवळ जळगाव),  पंकज चतुर राठोड (रा. तुकारामवाडी जळगाव) आणि यश देवीदास शंकपाळ (रा. हरिओम नगर, आसोदा रोड, मोहन टॉकीज समोर जळगाव) अशी अटक करण्यातआलेल्या चौघा तरुणांची नावे आहेत.

जळगाव शहरातील एस.टी. वर्क्स शॉप नजीक काही तरुण रस्ता लुटीच्या इराद्याने फिरत असल्याची गोपनीय माहिती पो.नि. जयपाल हिरे यांना समजली होती. कोंबिंग ऑपरेशनदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी लागलीच आपल्या सहका-यांना पुढील कारवाईकामी रवाना केले. या कारवाईत चौघा तरुणांसह दोघाअल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या कब्जातून रस्ता लुट करण्यासाठी असलेले साहीत्य जप्त करण्यातआले. या साहित्यात पिस्टल, चाकु, मिरचीची पुड, दोर आदींचा समावेश आढळून आला.

पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यापथकातील पो.ना. हेमंत कळसकर, चंद्रकात पाटील, प्रदीप पाटील, दिपक चौधरी, अशपाक शेख आदींनी मध्यरात्री तिन वाजेच्या सुमारास या कारवाईत सहभाग घेतला. अटकेतील आरोपी पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. स्वप्नील उर्फ गोल्या धर्मराज ठाकुर आणि निशांत प्रताप चौधरी या दोघांविरुद्ध प्रत्येकी पाच गुन्हे दाखल आहेत. यश देवीदास शंकपाळ याच्याविरुद्ध एक गुन्हा दाखल आहे. अटकेतील चौघांना न्या. श्रीमती सुवर्णा कुळकर्णी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यातआली आहे. सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड.  श्रीमती सुप्रीया क्षिरसागर यांनी न्यायालयीन कामकाज पाहीले. या गुन्ह्याचापुढील तपास पोलिस उप निरीक्षक आनंदसिंग पाटील व पो.ना. योगेश बारी करत आहेत. दोघा अल्पवयीनांची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here