आईसह पत्नीची हत्या – दुहेरी खूनाच्या घटनेमुळे भुसावळ शहरात खळबळ

जळगाव : एकाचवेळी आई आणि पत्नीची हत्या झाल्याची घटना भुसावळ शहरात आज भल्या पहाटे घडली. उघडकीस आलेल्या दुहेरी खूनाच्या घटनेमुळे भुसावळ शहरात खळबळ माजली असून घटनास्थळी पोलिस पथक दाखल झाले आहे. भुसावळ शहराच्या बालाजी लॉन परिसरात ही घटना घडली आहे. आराध्या हेमंत भूषण (23) आणि सुशीलादेवी भूषण (63) असे हत्या झालेल्या सासु सुनेचे नाव आहे.

भुसावळ शहरातील बालाजी लॉन परिसरात असलेल्या शगुन इस्टेट या इमारतीत हेमंत  श्रवणकुमार भुषण हा रेल्वे कर्मचारी वास्तव्याला आहे. त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि आई रहात होती.आज पहाटे हेमंत भुषण याचे त्याचीआई आणि पत्नी यांच्यासोबत घरगुती वाद झाला असे म्हटले जाते. या वादाने हिंसक वळण घेत हेमंत याच्याकडून दुहेरी खूनाची घटना घडली.  दुहेरी खून झाला त्यावेळी हेमंत याचा शालक ऋषभ हा भुषण परिवाराकडे आलेला होता. घटनेच्या वेळी त्याने वादात मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला असता तो जखमी झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here