वृत्तपत्राच्या स्टीकरचे चारचाकी वाहन बेवारस स्थितीत

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील म्हसावद ते नांद्रा या रस्त्यावर एक चारचाकी वाहन बेवारस स्थितीत उभे असून त्या वाहनाच्या चारही चाकातील हवा निघाल्याचे दिसून येत आहे. “दक्ष पोलिस टाईम्स” आणि “दै. जळगाव माझा” असे वृत्तपत्रांचे स्टीकर एमएच 19 बीजे 6773 क्रमांकाच्या बेवारस अवस्थेतील वाहनावर मागील बाजूने चिकटवण्यात आले आहे.

या वाहनाप्रमाणेच काही वाहनांवर देखील “दक्ष पोलिस टाईम्स” या नावाचे स्टीकर चिकटवण्यात येत असल्याचे दिसून येते. स्टीकरवरील “दक्ष” हा शब्द अगदी लहान आकारात (लहान फॉंट साईज) लिहीण्यात येत असल्याचे दिसून येते. संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणारे सर्वाधिक खपाचे  “पोलिस टाइम्स” हे साप्ताहीक सर्वश्रृत आहे. या नावाशी मिळत्या जुळत्या  “दक्ष पोलिस टाइम्स”  या टायटलमधील “दक्ष” या शब्दाला लहान स्वरुपात लिहीले जाते. एखाद्या पोलिस अधिका-याशी बोलतांना “पोलिस टाईम्स” असे सांगितले जाते असे देखील म्हटले जाते. त्यामुळे संभ्रम निर्माण होत असल्याचे बोलले जाते. हे वाहन या परिसरात कुणाकडे आले होते का?  कुठून कुठे जात होते? कुणी पळवून तर आणले नाही? असे प्रश्न निर्माण होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here