२८ मे पासून जैन हिल्स येथे राष्ट्रीय फलोद्यान परिषदेचे आयोजन

जळगाव, दि. २३ (प्रतिनिधी) – अमितसिंग मेमोरियल फाउंडेशन नवीदिल्ली व जैन इरिगेशन सिस्टिम्स् लिमिटेड जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 28 ते 30 मे दरम्यान राष्ट्रीय फलोद्यान परिषदेचे आयोजन जैन हिल्स येथे करण्यात आले आहे. फलोद्यान म्हणजे विविध फळ पिकावर व भाजीपाला व अन्नधान्य उप्दानावर वातावरण बदलाचा होणारा परिणाम त्यावर मात करण्यासाठी विविध तंत्रज्ञान क्रॉप कुलींग, टर्मिनल हिट मॅनेजमेंट, अल्ट्रा हायडेन्सिटी, अचूक पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन अशा विविध विषयावर शोधनिबंध सादर केले जाणार आहेत. याच परिषदे दरम्यान ‘केळीवरील रोगराई व्यवस्थापन व बटाट्याचे गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मिती’ या दोन विषयावर 29 मे रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या परिषदेमध्ये एकूण 11 सत्र असून जवळपास 100 शास्त्रज्ञ आपले शोधनिबंध सादर करणार आहेत. देशभरातील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे संचालक व शास्त्रज्ञ, देशातील विविध कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ यांचा सहभाग असणार आहे. या परिषदेमध्ये काही विद्यापीठांचे कुलगुरू व माजी कुलगुरू देखील उपस्थित असणार आहेत. 28 मे रोजी (Confederation of Horticulture Associations of India) CHAI ‘चाई’चे पुरस्कार दिले जाणार आहेत. याच श्रुंखलेत 30 मे रोजी ‘उद्यान रत्न’ पुरस्कारांचे वितरण देखील करण्यात येणार आहेत. संबंधीत सर्वांनी या परिषदेचा लाभ घ्यावा आणि आपली उपस्थिती नोंदवावी यासाठी 9422774943 व 9422776925 या क्रमांकावर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here