जळगाव जिल्ह्यातून दोघे गुन्हेगार स्थानबद्ध

जळगाव : जळगाव जिल्ह्यातून दोघा गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. रणजीतसिंग जिवनसिंग जुन्नी (रा. राजीव गांधी नगर जळगाव) आणि काजल उर्फ रफिक शेख रशीद (रा. मुंबई गल्ली गांधलीपुरा अमळनेर) अशी एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

जळगाव शहरातील जीवनसिंग जुन्नी याच्याविरुद्ध मलकापूर शहर, रामानंद नगर, जिल्हापेठ आदी पोलिस स्टेशनला विविध गुन्हे दाखल आहेत. अमळनेर येथील काजल उर्फ रफीक शेख रशीद याच्याविरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशनला विविध गुन्हे दाखल आहेत. या कारवाईकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्यासह त्यांच्यापथकातील सहायक फौजदार युनुस शेख, हे.कॉ. सुनिल दामोदरे, जयंत चौधरी. पो.कॉ. इश्वर पाटील आदींनी सहभाग घेतला. काजल उर्फ रफीक शेख याची अमरावती कारागृहात तर रणजीत सिंग जुन्नी  याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here