नवविवाहितेचा खून करणा-यास जन्मठेप

धुळे : शिरपूर येथील संगिता लॉजमधे गेल्या चार वर्षापुर्वी नवविवाहीतेचा खून झाला होता. रेणूका धनगर या नवविवाहितेचा खून करणा-या पप्पु शेटे उर्फ नरेंद्र एकनाथ भदाणे या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा सत्र न्या. ए. एच. सैय्यद यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

शिरपूर येथील वडगल्ली येहे राहणारी रेणूका धनगर ही नव विवाहीता लग्नाच्या दुस-या दिवशी माहेरी आली होती. मोबाईल घरात विसरुन ती घराबाहेर पडली होती. त्यावेळी पप्पू शेटे याने तिला संगिता लॉजवर नेले. तु माझ्याशी लग्न का केले नाही या कारणावरुन त्याने तिच्यासोबत वाद घातला होता. यावेळी त्याने तिक्ष्ण हत्याराने तिचा गळा चिरुन खून केला होता. तत्पुर्वी त्याने तिच्यासोबत एक सेल्फी काढला होता. 25 मार्च 2019 रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. जिल्हा सरकारी वअकील देवेंद्र सिन्ह तंवर यांनी या प्रकरणी सरकारपक्षाच्या वतीने न्यायालयीन कामकाज पाहिले. आरोपीस जन्मठेपेसह दहा हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here