नकली दागिने सोन्याचे भासवून मुथुट फिनकॉर्पची फसवणूक

जळगाव : सोन्याचे नकली दागिने असली असल्याचे भासवून मुथुट फिनकॉर्प प्रा.लि. या संस्थेची रामानंद नगर शाखेची फसवणूक उघड झाली आहे. या फसवणूकी प्रकरणी एकुण तेरा जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरमहा तिस दिवसांच्या आत कर्जाचा हप्ता भरणे बंधनकारक असतांना या संशयित आरोपींनी न भरल्याचा देखील कंपनीच्या वतीने दाखल फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.

प्रमोद सुरेश बारी (म्युनिसिपल कॉलनी जळगाव), आधार विठ्ठल सोनवणे (समता नगर जळगाव), वासिम बशरत सैय्यत (नवा तांबापुरा जळगाव), गजला बी तौसिफ शेख ताज पान सेंटरजवळ शाहु नगर जळगाव), बिलाल मो. वालिउद्दीन शेख (मलिक नगर मेहरुण जळगाव), प्रभात अब्दुल शेख (इंदीरा नगर शाहु नगर जळगाव), सलिम खान अरमान खान (साटगर मोहल्ला पाळधी धरणगाव), अनिल रमेश चौधरी (सिद्धी विनायक शाळेजवळ जळगाव), सचिन दशरथ सैंदाणे (कोळीपेठ जळगाव), रहिम हसनबेग मिरा (तांबापुरा जळगाव), भावना जवाहरलाल लोढा (रौनक कॉलनी अयोध्या नगर जळगाव), अंजुम मोहम्मद पटेल (न्यु दूध फेडरेशन पिंप्राळा जळगाव), गुलजार सरवर पटेल (इंद्रप्रस्थ नगर पोलिस कॉलनी जळगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.  पोलिस नाईक रेवानंद साळुंखे पुढील तपास करत आहेत.    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here