प्रदिप मिश्रा यांची कथा श्रवण करणा-या श्रोत्यांचे दागिने, मोबाईल लंपास

छ. संभाजीनगर : कथा वाचक प्रदिप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी आलेल्या महिला श्रोत्यांच्या ताब्यातील चार मंगळसुत्रे व सात मोबाईल फोन चोरी झाल्याची घटना येथील पिसादेवी रोडवरील मंडपात घडली. काही महिलांचे मंगळसुत्र जेवणाच्या स्टॉलवर तर काहींचे मुख्य प्रवचन मंडपात चोरी गेले.

महिलां श्रोत्यांनी आपले दागिने सांभाळून ठेवण्याबाबत घोषणा केली जात असतांना हा चोरीचा प्रकार घडला. शिवमहापुराण कथा श्रवण केल्याने जीवनात कल्याण होते असे सांगितले जाते. काही वर्षापुर्वी जळगाव येथे सागर पार्क मैदानावर कथा श्रवण केली जात असतांना एका अधिका-याच्या घरी त्याच्या पत्नीचे दागिने चोरी झाले होते. सिहोर येथील घटनेत रुद्राक्ष मिळवण्याच्या प्रयत्नात अनेकांना आपला जीव गमवावा लागला.         

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here