नाशिकला पन्नास हजाराच्या लाचेत अडकली महिला अधिकारी

नाशिक : मुख्याध्यापकाच्या बडतर्फीला न्यायाधिकारणाने स्थगिती दिल्यानंतर देखील त्यांना सेवेत हजर करुन घेतले जात नव्हते. संबंधीत शैक्षणीक संस्थेविरुद्ध कारवाईचे पत्र तयार करुन देण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच घेतांना मनपा शिक्षण विभागातील अधिकारी सुनिता धनगर आणि पाच हजार रुपये लाच घेतांना त्यांचा लिपीक नितीन जोशी अशा दोघांना एसीबीने ताब्यात घेत अटक केली आहे.

नाशिक शहरातील एका संस्थेत तक्रारदार हे कार्यरत होते. त्यांच्याविरुद्ध गैरवर्तनाचा ठपका ठेवून त्यांना बडतर्फ करण्यात आले होते. बडतर्फीविरुद्ध त्यांनी न्यायाधिकरणात दाद मागितली होती. त्यानंतर त्यांच्या बडतर्फीला स्थगिती देण्यात आली. तरीदेखील त्यांना हजर करुन घेण्यात येत नव्हते. याबाबत संबंधीत शैक्षणीक संस्थेविरुद्ध कारवाई करण्यासाठी पत्र देण्यासाठी तक्रारदार मुख्याध्यापकाकडे महिला अधिकारी सुनिता धनगर यांच्याकडून पन्नास हजाराची लाच मागण्यात आली. सुनिता धनगर यांच्या घराची झडती देखील घेण्यात आली.      

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here