वारंवार अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणा-यास आजन्म कारावास

धाराशिव : चार अल्पवयीन मुलींसह तिन महिलांवर लैंगिक अत्याचार करणा-या नराधमास गुरुवारी आजन्म कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. अत्याचार करणारा नराधम अंकुश वडणे हा सराईत आरोपी आहे. जिल्हा व सत्र न्या. अंजू शेंडे यांच्या न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. आजन्म कारावासा ऐवजी आरोपीस फाशीची शिक्षा मिळण्यासाठी अपील केले जाणार असल्याचे सरकारी वकील अ‍ॅड. निलेश जोशी म्हटले आहे.

सहा वर्षाची अल्पवयीन मुलगी ती रहात असलेल्या घरामागे शौचास गेली असता तिला आरोपीने शेजारच्या शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून काही महिला शेतात आल्या. त्यावेळी आरोपी अंकुश वडणे हा कुकर्म करत मोबाईलमधे व्हिडीओ चित्रीकरण करतांना आढळून आला. महिलांनी त्याला पकडून त्यावेळी चोप दिला.

20 ऑगस्ट 2022 रोजी घडलेल्या या घटने प्रकरणी तुळजापूर पोलिस स्टेशनला बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या नराधमाने यापुर्वी सहा जणींवर अत्याचार  केले आहेत. त्यात अनुक्रमे चार, आठ, दहा आणि सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. न्यायालयाने यापूर्वी दोनवेळा सुनावलेली शिक्षा भोगून आल्यानंतर देखील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्याची आरोपीची सवय गेली नाही. या खटल्यात एकुण 22 साक्षीदार तपासण्यात आले.    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here