प्रहार उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

जळगाव – यावल तालुक्यासह जिल्हाभरात खराब हवामानामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली आहे. यापूर्वीच बेमोसमी पावसामुळे शेतकरी व नागरिक अडचणीत असताना पुन्हा एकदा वादळी – वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करावे अधिकाऱ्यांनी कोणत्याही जाचक – अटी न घालता पंचनामे करावे अशा सूचना प्रहार उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांच्याकडून स्थानीक प्रशासनाला देण्यात आल्या आहे.

रावेर शहरात अतिशय जुनी व मोठी झाडे थेट घरावर कोसळल्याने घरे तुटून उध्वस्त झाली आहे. यामध्ये सुदैवाने कुटलीही जिवंत हानी झालेली नसली तरी घर – संसार उघडल्यावर आले आहे. नुकसान ग्रस्त परिवाराला आधार म्हणुन शासनाकडून तात्काळ मदत देण्यात यावी सर्वाधिक नुकसान केळी उत्पादक क्षेत्र असलेल्या रावेर – यावल तालुक्यातील खिरोदा, रसलपुर, मंगरूळ, पिंपरी, अहिरवाडी येथे केळी पिके भुईसपाट झाली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयाचा फटका बसला आहे.

याबाबत शेतकऱ्यांचे नेते,प्रहार पक्ष प्रमूख मंत्री बच्चुभाऊ कडू यांच्याकडे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती देण्यास आली असल्याचे प्रहार उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांनी दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून तात्काळ मदत जाहीर न करता थेट अर्थ सहाय्य करावे अशी मागणी करण्यात येणार आहे.

यापूर्वी झालेल्या नुकसानाची भरपाई अद्याप पर्यंत शासनाकडून शेतकऱ्यांना मिळालेले नाही. यासोबतच शासनाने दिलेल्या पीक विम्याचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. आसमानी व सुलतानी संकटांत शेतकऱ्यांना सावरण्याची गरज असून प्रहार उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांनी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला कोणत्याही कागदपत्रां शिवाय जाचक अटीमध्ये न अडकवता थेट पंचनामा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here