वकील महोदयांची फसवणूक – जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा

जळगाव : कुरिअर मधे पार्सल अडकून पडले असल्याचा बहाणा करुन पाठवलेल्या वेब लिंकच्या माध्यमातून जळगाव येथील तरुण वकील महोदयांची फसवणूक झाल्याची घटना उघड झाली आहे. पलीकडून बोलणा-या मोबाईल धारकाने पाठवलेल्या टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून पाठवलेल्या लिंकच्या माध्यमातून चार बॅंक खात्यातून वकील महोदयांची एकुण 41 हजार 697 रुपयांची फसवणूक झाली आहे.

निखील विजय भोलाणे हे युवा वकील असून न्यु बि.जे.मार्केट मधील फ्लॅटमधून त्यांचे कामकाज चालते. त्यांना वेळोवेळी चार मोबाईल क्रमांकावरुन फोन आले. आपले कुरियरचे पार्सल अडकून पडले असल्याचेत्यांना सांगण्यात आले. एका मोबाईल क्रमांकावरुन त्यांना वेब लिंकचा एक टेक्स्ट मेसेज पाठवण्यात आला. त्या लिंकवर वकील महोदयांनी क्लिक केल्यानंतर त्यांच्या बॅंक खात्यातून फसवणूक करणा-यांनी रक्कम स्विकारली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अ‍ॅड. भोलाणे यांनी जिल्हापेठ पोलिस स्टेशन गाठून आपली कैफीयत मांडून फिर्याद नोंदवली.  गु.र.न. 220/23 भा.द.वि. 420,406 नुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास हे.कॉ. महेंद्र पाटील करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here