दारुच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला – पतीविरुद्ध गुन्हा

जळगाव : दारुच्या नशेत वेळोवेळी पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत तिला कृर वागणूक देणा-या पतीविरुद्ध फैजपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या 6 जून रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घराच्या किचनमधील भिंतीवर पत्नीला ढकलून चापटा बुक्क्यांनी मारहाण करुन गळा पकडून मारहाण करण्याचा प्रकार फैजपूर येथील लक्ष्मी नगर परिसरात विवाहितेबाबत घडला. विषय एवढ्यावरच न थांबता तापाच्या पाच गोळ्या घेवून त्या बळजबरी पत्नीच्या तोंडात घालून तिला जीवे ठार करण्याचा पतीने प्रयत्न केला.

या घटने प्रकरणी पतीला त्याच्या आईवडीलांनी चिथावणी दिल्याचे म्हटले आहे. फैजपूर शहरातील लक्ष्मी नगर परिसरात घडलेल्या या घटने प्रकरणी फैजपूर पोलिस स्टेशनला खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गु.र.न. 118/23 भा.द.वि. 307, 498 (अ), 109, 323, 504, 506, 510 नुसार पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक मोहन लोखंडे करत आहेत.  

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here