लोखंडी चॉपरसह तरुण ताब्यात

जळगाव : लोखंडी चॉपर बाळगून परिसरात दहशत माजवणा-या तरुणास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने चॉपरसह ताब्यात घेतले आहे. दिनकर उर्फ पिण्या रोहीदास चव्हाण (रा. सुप्रिम कॉलनी जळगाव) असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

दिनकर चव्हाण हा चॉपरसह दहशत माजवत असल्याची गोपनीय माहिती पो.नि. जयपाल हिरे यांना समजली होती. त्या माहितीच्याआधारे एमआयडीसी परिसरातील रामदेव बाबा मंदीर सुप्रिम कॉलनी भागातून त्याला हत्यारासह ताब्यात घेण्यात आले. पो.नि. जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक आनंदसिंग पाटील यांच्यासह पो.ना. किशोर पाटील, विकास सातदिवे, इश्वर भालेराव आदींनी यांनी या कारवाईत सहभाग घेतला. पो.कॉ. ललित नारखेडे यांनी या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास किशोर पाटील करत आहेत.    

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here