ना. शरद पवारांच्या कार्यक्रमात रोख रकमेसह मोबाईलची चोरी

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे झालेल्या ना. शरद पवार यांच्या राज्यस्तरीय शिबीरात मोबाईल आणि रोख रक्कम चोरी झाल्याप्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव उदय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौरव पाटील यांनी म्हटल्याप्रमाणे ते अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे आयोजीत शरद पवार यांच्या राज्यस्तरीय शिबीरात गेले होते. त्याठिकाणी इतर लोकांच्या खिशातील मोबाईल व रोख रकमेसह त्यांच्या खिशातील रोख रुपये 19 हजार 500 चोरी झाले आहेत. याप्रकरणी धुळे, शिरपूर आणि मालेगाव येथील चौघांसह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक घनशाम पवार करत आहेत. संबंधीत संशयितांना अटक करण्यात आली आहे.       

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here