आजचे राशी भविष्य (5/7/2023)

आजचे राशी भविष्य (5/7/2023)

मेष : कार्यक्षेत्रात विरोधकांचा उपद्रव वाढेल. काही बिकट प्रसंग कौशल्याने हाताळाल.

वृषभ : तुम्हाला आर्थिक उन्नतीचे विविध मार्ग खुणावतील. स्वत:च्या व्यक्तिमत्त्व विकासावरही भर द्याल.

मिथुन : मुलांची अभ्यासातील प्रगती समाधानकारक राहील. गृहिणी आज पसारा आवरण्यास प्राधान्य देतील.

कर्क : स्पष्ट बोलल्याने नाती दुरावतील. वावरताना वाणीत मृदुता असु द्या.

सिंह : पूर्वीच्या कष्टांचे फळ पदरात पडेल. घरात आर्थिक सुबत्ता नांदेल. पाहुण्यांची वर्दळ राहील.

कन्या : उद्योग-व्यवसायात आक्रमकतेने घेतलेले निर्णय योग्य ठरतील. सहकाऱ्यांवर अंकुश गरजेचा राहील.

तूळ : खर्चाचे प्रमाण आवाक्याबाहेर जाईल. संयमाची गरज राहील.

वृश्चिक : कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध प्रस्थापित होतील. मोठ्या लोकांमधील उठबस फायदेशीर राहील.

धनू :  बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. नातेवाईकांकडून काही चांगली बातमी येईल.

मकर : ज्येष्ठ मंडळी तीर्थाटनाचे बेत आखतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात परिश्रम वाढवावे लागतील.

कुंभ : फक्त पेलणाऱ्या जबाबदाऱ्यांचा स्विकार करावा. कायद्याची चौकट मोडू नका.

मीन : जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. गृहिणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने आनंदित होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here