खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत जळगावचा तसीन तडवी प्रथम, गुणवंत कासार द्वितीय

जळगाव – येथील जिल्हा बुध्दिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या बुध्दिबळ स्पर्धेत ६ फेऱ्याअखेर ६ गुण मिळवीत स्पर्धेत जळगावच्या तसीन तडवी याने प्रथम क्रमांक मिळवला.त्यास १२०० रूपयांचे पारितोषिक व चषक प्राप्त केला. तर दुसर्‍या स्थानी जळगावचाच फिडे मानांकित खेळाडू गुणवंत कासार याने ५ गुणांसह द्वितीय स्थान पटकाविले.त्यास तर तिसरे स्थान जयेश सपकाळे पटकाविले. स्पर्धेत खुल्या गटातील पहिल्या दहा खेळाडूंना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्तेजनार्थ बक्षीस वयोगटातील पहिल्या तीन खेळाडूंना मेडल देऊन गौरवण्यात आले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुक शेख, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव तसेच अप्पर कोषाधिकारी शकील देशपांडे, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार अरविंद देशपांडे, वरिष्ठ राष्ट्रीय खेळाडू नथू सोमवंशी, प्रवीण ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. स्पर्धेत एकूण ६० खेळाडूंनी सहभाग नोंदवला त्यात १५ फिडे मानांकित खेळाडू होते.स्पर्धेत पंच म्हणून प्रवीण ठाकरे व परेश देशपांडे यांनी काम पाहिले. पारितोषिक वितरण समारंभाचे आभार अभिषेक जाधव यांनी मानले.

खुला गटातील विजयी खेळाडू पुढील प्रमाणे १) तसीन तडवी सहा गुण २) गुणवंत कासार ३) जयेश सपकाळे ४) अक्षय सावदेकर ५) विवेक तायडे ६) संस्कार पवार ७) अजित कुमार शेगोकार ८) आयुष गुजराथी ९) किरण सोनवणे १०) अजिंक्य निकम १३ वर्षाखालील वयोगट १) क्षितिज वारके २) टिळक सरोदे ३) सोहम चौधरी ११वर्षाखालील वयोगट १) आरुष सरोदे २) निकुंज जैन ३) हिमांशू सरोदे ९ वर्षाखालील वयोगट १) देवांक लड्डा २) गौरव बोरसे ३) रोनीत बालपांडे विशेष उत्तेजनार्थ श्लोक वारके, अजय पाटील,गुणवंत पाटील, सुकृत पाठक यांना बक्षिसे देण्यात आली. उत्तेजनार्थ महिला खेळाडू १) ऋतुजा बालपांडे २) चेतना सोनवणे ३) शरण्या शिंदे तर सर्वात लहान खेळाडू म्हणून विशेष उत्तेजनार्थ चाळीसगावची , शौर्या पाटील हिला गौरवण्यात आले.
स्पर्धेत पंच म्हणून प्रवीण ठाकरे, नथू सोमवंशी,परेश देशपांडे,अभिषेक जाधव, आकाश धनगर यांनी काम पाहिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here