अश्लिल शिवीगाळ – आरटीओ एजंट विरुद्ध गुन्हा 

जळगाव : अश्लिल शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली आरटीओ कार्यालयातील दोघा खासगी एजंट विरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश ढेंगे आणि सुलतान मिर्जा असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघा खासगी आरटीओ एजंटस् ची नावे आहेत.

रामानंद नगर पोलिस स्टेशनला दाखल फिर्यादीनुसार जळगाव आरटीओ कार्यालयात खासगी एजंट म्हणून काम करणारे गणेश ढेंगे आणि सुलतान मिर्झा हे दोघे एजंट विशाल भगवान बटुळे या कर्मचा-याजवळ आले. विशाल बटुळे हे कार्यालयीन कामकाज करत असतांना आलेल्या एजंटस् नी “तुझा साहेब कुठे गेला….बोलव त्या साल्याला मादरचोदाला” अशी अश्लिल शिवीगाळ करत संभाषणाला सुरुवात केली. खासगी एजंटस् चा मोठा आवाज ऐकून आरडाओरड करु नका असे म्हणत हळू बोलण्यास सांगितले. आपल्याला हळू बोलण्यास सांगितल्याचा राग आल्याने एजंटस् नी कर्मचारी बटुळे यास “तु साहेबाचा पंटर आहे, तु त्याची …..खातो असे म्हणत शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस नाईक चंद्रकांत पाटील करत आहेत.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here