चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणा-या तिघांना अटक

जळगाव : जळगाव शहरातील मेहरुण तलावावर चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणा-या चौघांपैकी तिघांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. अटकेतील आरोपींपैकी एकावर सोळा, दुस-यावर चार आणि तिस-यावर एक गुन्हा दाखल आहे. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या सहा तासात एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने माहिती काढत चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. फरार झालेल्या एकाचा शोध एमआयडीसी पोलिसांकडून सुरु आहे.

जळगाव येथील शासकिय आयुर्वेदीक महाविदयालयात बीएएमएसचे शिक्षण घेणारे हिमांशू कुटे आणि देवेश संजय चव्हाण हे दोघे विद्यार्थी मित्र 11 जुलै रोजी मेहरुण तलाव परिसरात गप्पा करत बसले होते. त्याचवेळी मोटार सायकलवर चौघे अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. आलेल्या चौघांनी चाकूचा धाक दाखवत दोघा मित्रांकडे असलेले दोन मोबाईल जबरीने हिसकावून घेतले. दरम्यान हिमांशू याच्यावर चाकूने हल्ला देखील झाला. हिमांशू कुटे या विद्यार्थ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यातआला.

या गुन्ह्याच्या तपासकामी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या निर्देशनाखाली तिन पथके तयार करण्यात आली. त्यात पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे, पोलिस उप निरीक्षक रविंद्र गिरासे व सहायक फौजदार अतुल वंजारी यांचा समावेश करण्यात आला. वैदयकिय शिक्षण घेणा-या तरुण मुलांवर शस्त्राने हल्ला झाल्यामुळे तसेच गुन्हा मेहरुण ट्रॅकवर रात्रीच्या वेळी घडल्याने या संवेदनशील घटनेबाबत विशेष लक्ष घालण्याच्या सुचना पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांनी दिल्या होत्या.

या गुन्ह्याच्या तपासात पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे, पोकॉ. छगन तायडे, किरण पाटील यांनी कोणताही ठोस पुरावा नसतांना केवळ फिर्यादीने दिलेल्या अनोळखी इसमाच्या वर्णनाचा आधार घेत रेकॉर्डवरील एका गुन्हेगारास ताब्यात घेतले. त्याच्याजवळ गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटार सायकल मिळून आली. सखोल चौकशीअंती त्याने आपला गुन्हा कबुल करत तिघा साथीदारांची नावे उघड केली.  

गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल चोरट्यांनी जळगाव शहरातील सम्राट कॉलनीतून चोरी केली होती. ती मोटार सायकल दत्ता गोविंदा हिवराळे यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले आहे. इतर दोघा आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांनी देखील आपला गुन्हा कबुल केला. गुन्ह्यात जबरी चोरी केलेले दोन मोबाईल फोन, चोरी करुन गुन्हयात वापरलेली मोटार सायकल आणि अजून एक मोटार सायकल असा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

अटकेतील आरोपींनी एक घरफोडी, दोन मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली. ओळख परेडकामी अटकेतील आरोपींना न्या.सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकातील पोउनी दिपक जगदाळे, रविंद्र गिरासे, सफौ. अतुल वंजारी, पोहेकॉ. सचीन मुंढे, पोना. किशोर पाटील, विकास सातदिवे, पोकॉ. छगन तायडे, किरण पाटील, योगेश बारी, इश्वर भालेराव, चंद्रकांत पाटील, ललीत नारखेडे आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here